Arogya Vibhag Bharti 2021

आरोग्य सेवा विभाग परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  ही परीक्षा संपूर्ण राज्यात एकाच दिवशी दिनांक 28 फेब्रुवारी 2021 ला घेण्यात येणार आहे. 

Arogya Vibhag Bharti 2021: पहिल्या टप्यात 8500 Arogya Vibhag Bharti आज 18 जानेवारीला Arogya Vibhag Bharti ची पहिली जाहिरात निघालेली असून तसे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी Officially Announce केले आहे कि 15 फेब्रुवारीपर्यंत नोकरभरतीच्या प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

आरोग्य विभाग भरती : Arogya Vibhag Bharti 2021

जर एकूण पदांचा विचार केला तर १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 8 हजार 500 पदांची भरती केली जाणार आहे.

गट-क पदांच्या अंदाजे 3341 जागा रिक्त आहेत. त्यामुळे या भरती संदर्भातील सर्व माहिती तसेच Latest Update साठी या संकेत स्थळाला भेट देत राहा, आणि आपले Telegram channel Join करा.

आरोग्य विभाग भरती 2021 पार्श्वभूमी:

आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पद भरतीसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महा पोर्टल वर जाहिरात देऊन अवेदन मागविण्यात आली होती परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल रद्द झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

दरम्यान covid-19 साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा वरील वाढता ताण आणि रिक्तपदे लक्षात घेतात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागात रिक्त पदांपैकी 50% पदभरतीला मान्यता दिलेली आहे.

पदभरती ही खाली पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे तसेच आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Aarogya Vibhag Bharti बद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरे

Que. ID आणि Password विसरला आहे? आता Hall Ticket कसे मिळणार?

Ans: विद्यार्थ्यांनी जे आरोग्य विभागाचे फॉर्म भरले होते ते महापरीक्षा पोर्टल वरून भरलेलं होते आयडी आणि पासवर्ड महा पोर्टलचे आहे महापरिक्षा पोर्टल बंद झाल्यामुळे आता याचा काही संबंध नाही, त्यामुळे आरोग्य विभागाचा ID आणि Password विसरला असेल तरीही काही फरक पडणार नाही.

आता तुमचा दुसरा प्रश्न असेल की ID, Password विसरला आहे तर हॉल तिकीट कसे डाऊनलोड होणार तरी या संदर्भात आरोग्य विभाग तुम्हाला मेसेज किंवा ईमेल आयडी वरून माहिती कळवणार कारण तुम्ही महापरीक्षा पोर्टल मधून फॉर्म भरताना आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिलेली होता त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. या संदर्भात आरोग्य विभाग लवकरच कळणार. (परीक्षेच्या ८ दिवसा आधी)
Hall Ticket कसं मिळणार याबद्दल जशी आरोग्य विभागाकडून माहिती येणार तसं लगेच आम्ही तुम्हाला कळवू.

Que. आरोग्य विभाग भरतीत मी ३ Forms भरले आणि सर्व Papers एकाच दिवशी आहेत, तर कसं आता?

Ans: याबद्दल आरोग्य विभागाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही पण इथे एकच सांगितले आहे कि, २८ फेब्रुवारी ला एकाच दिवशी Papers होणार, या बद्दल आरोग्य विभागाची पुढे कुठली Update आल्यास आम्ही तुम्हाला लगेच कळवू.

Que. या भरतीत ZP आरोग्य सेवक चे पद आहे का?

Ans: नाही, ही पदे आरोग्य संचनालयाच्या आहेत? ZP च्या पदांबद्दल अजून काही Update आलेले नाही याबद्दल पुढे काही Update आल्यास आम्ही तुम्हाला लगेच माहिती देऊ.
ZP आरोग्य सेवक ची देखील पुढे भरती होणार आहे मात्र आता तरी त्यासंदर्भात Update नाही.

Que:  ही परीक्षा ऑफलाईन होणार किंवा ऑनलाईन होणार?
Ans: 
ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे. 

Que: आधी भरपूर जागा होत्या आणि मी ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला होता आता तिथे जागा शून्य जागा दाखवत आहेत?

Ans: ५०% जागा कपात केलेल्या आहे त्यामुळे असं झालेलं आहे. पण तरी सुद्धा परीक्षा द्या, आणि राहिलेला नंतरचा प्रश्न जागा नाहीत तरी देखील परीक्षा दिली तर selection च काय तर याबद्दल आरोग्य विभाग पुढे स्पष्टीकरण देईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू.

Que: ज्या मुला मुलींचे वय SEBC मध्ये बसत होते पण त्या मुला मुलींचे वय Open मध्ये बसत नाही आणि EWS चा आरक्षणाचा लाभ सर्वांनाच मिळेल असे देखील नाही त्या मुलींनी काय करायचे?

Ans: यामध्ये तुमचे जे वय गृहीत धरणार आहे ते 2019 चे असेल म्हणजेच (फॉर्म भरताना चे) फेब्रुवारी 2019 मध्ये फॉर्म भरताना चे वय गृहीत धरले जाणार आहे. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला होता SEBC मधून तेव्हा तुमचे वय 38 वर्षे होते आणि आत्ता  2021 मध्ये तुमचे वय 38 च्या वर झालेले आहे तरीसुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट नसेल तरीसुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता.

Que. मी ओपन मधून फॉर्म भरलेला होता मला आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढता येईल का आणि ते मिळाल्यावर परत दोनशे रुपये भरावे का 2019 मध्ये पाचशे रुपये भरले होती

Ans: तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला होता म्हणजे तुम्हाला आता EWS सर्टिफिकेट मिळेल तरी सुद्धा तुम्ही ओपन मधूनच परीक्षा देऊ शकता त्यामुळे तुम्हाला आता आणखीन दोनशे रुपये भरण्याची गरज नाही. 

Que. EWS प्रमाणपत्र 2019-20 च जमतंय का? 

Ans: होय चालणार. EWS सर्टिफिकेट जास्तीत जास्त 27 फेब्रुवारी किंवा 28 फेब्रुवारी पर्यंत असायला पाहिजे.
ज्या विद्यार्थ्यांनी SEBC मधून फॉर्म भरलेला होता आणि त्यांच्यापैकी जे विद्यार्थी Open मधून परीक्षा देणार आहेत त्यांना दोनशे रुपये भरायचे आहे. ही पावती 24 फरवरी पर्यंत जमा करायची आहे त्याच्यानंतर चालणार नाही आणि EWS सर्टिफिकेट डॉक्यूमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस दाखवायचे आहे.

Que. महाराष्ट्र पब्लिक हेल्थ या नावाची महापोर्टल वर २०१९ मध्ये जी जाहिरात आलेली होती ती हीच जाहिरात आहे का?

Ans: होय, ती हीच जाहिरात आहे.

Que. Arogya Vibhag Bharti 2021 कधी सुरु होणार ?
Ans
: १८ जानेवारी २०२१ पासून पहिला टप्पा सुरु झालेला आहे. या भरती विषयीची सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Que. आरोग्य विभाग भरती कोण-कोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?
Ans: आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागातील गट ‘क’ अंतर्गत विभिन्न जागांचा उल्लेख केलेला आहे, सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली Official PDF बघा.

Que. आरोग्य विभाग भरती 2021 किती जागांसाठी असेल?

Ans: एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरती केली जाणार आहे. गट-क पदांच्या अंदाजे 3341 जागा रिक्त आहेत.

Que. आरोग्य विभाग भरती 2021 कोण-कोणत्या जिल्हांसाठी होणार आहे ?

Ans: Almost महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे असण्याची अपेक्षा आहे.

मराठा आरक्षण FAQ : Arogya Vibhag Bharti 2021

Que. फेब्रुवारी 2019 मध्ये महा पोर्टल द्वारे फॉर्म भरलेले विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील का?
कोण कोण पात्र असतील?

Ans: फेब्रुवारी 2019 मध्ये महा पोर्टल वर जाहिरात प्रक्रियेद्वारे अर्ज मागविण्यात आले होते त्या अर्जानुसार पात्र असलेले उमेदवार या पदभरतीची परीक्षा देण्यास पात्र ठरतील. नवीन उमेदवार फॉर्म भरू शकणार नाही ज्यांनी २०१९ मध्ये फॉर्म भरलेला होता फक्त तेच हि परीक्षा देऊ शकणार आहेत.

Que. आरक्षणाबाबत सर्वोच्च नायल्याचे काय म्हणणे आहे?
Ans:
माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 9 /9/ 2020 च्या सुनावणीत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली होती.

Que. महाराष्ट्र सरकार चे पाऊल?
Ans:
सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणावर दिलेल्या स्थगिती नंतर महाराष्ट्र शासनाने दिनांक 23/12/2020 नुसार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील घटकांना अनुज्ञयतेनुसार दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गाचा लाभ देण्यास मान्यता दिलेली आहे.

Que. मी 2019 मध्ये महा पोर्टल द्वारे एसईबीसी अंतर्गत फॉर्म भरलेला, आता सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर काय करू?
Ans:
अशा उमेदवारांनी आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (ईडब्ल्यूएस) लाभ घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सक्षम अधिकार्‍याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावे व परीक्षेच्या दिवसांपर्यंत सादर करावे.

Que. जर मला (ईडब्ल्यूएस) लाभ मिळू शकणार नसल्यास मी काय करावे ?
Ans:
एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून लाभ मिळू शकणार नाही त्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गण्यात येईल व त्यांनी खुल्या प्रवर्गाचे सर्व नियम वयोमर्यादे सह लागू राहतील.

Arogya Vibhag Bharti 2021 : जाहिरात

पदाचे नाव – गट क अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पद संख्या – अंदाजे 3341 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag ची Official Published केलेल्या जाहिरात बद्दल PDF Files

PDF जाहिरात 1 :Download
PDF जाहिरात 2 :Download
PDF जाहिरात 3 :Download

Other Useful Links:

या Article मध्ये तुम्हाला पडलेले सर्व महत्वाचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आमचा प्रयत्न आवडला असेल आणि तुमचे आणखीन काही प्रश्न असल्यास Comment करून सांगा.

आणि हि Post जास्तीत जास्त Share करून आपल्या बांधवानपर्यंत पोहचवा कारण मराठा आरक्षण बद्दल त्यांची काही प्रश्न असल्यास या Article द्वारा नक्कीच फायदा होईल.

Leave a Comment