पोलीस भरती : Maharashtra Police Bharti 2021

पोलीस भरती : New Update 22/01/2021

राज्यात पोलिस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी मेगभरती करण्यात येणार आहे आणि लेखी परीक्षा की शारीरिक चाचणी असा संभ्रम पोलिस भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना निर्माण झाला पहिल्या टप्प्यात आधी लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे तर पोलिस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात आणि शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

Maharashtra Police Bharti Information in Marathi

Que: आधी लेखी परीक्षा की शारीरिक चाचणी?
Ans: पहिल्या टप्प्यात आधी लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे तर पोलिस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे

महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2020-21 ह्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने परीक्षा घेण्याची तयारी सुरू करताच पोलिस भरती 2021 येत्या 8 दिवसांत सुरू होत आहे. या महा पोलिस भरती 2021 मध्ये पोलिस भरती करण्यासाठी जवळपास १२,५२८ रिक्त जागा उपलब्ध असतील. पहिल्या टप्प्यात या विभागात रिक्त पदांवर 7231 रिक्त पदांसाठी पोलिस भरती होईल.

पोलीस भरती : New Update 21/01/2021

राज्यात घेण्यात येणाऱ्या  महा पोलिस पदासाठीची भरती प्रक्रीया राबविण्यासाठी  सरकारने  नवीन GR च्या स्वरूपात  आणखी  एक पुढचे पाऊल  टाकलेले आहे.  त्याच अनुषंगाने नवीन GR – आज २१ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झाले आहे. या नवीन GR अनुसार एकूण १२,५२८ पदांच्या पोलीस भरतीस मान्यता देण्यात आली आहे. हा महत्वाचा अपडेट आपल्या सर्व मित्रांना शेयर करा.

  • या GR संबंधी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरून GR डाउनलोड करा.

राज्याच्या पोलीस दलातील पोलिस शिपाई संवर्गातील सन 2019 मध्ये रिक्त असलेल्या 5,297 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती. त्याचदरम्यान जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील सेवानिवृत्त पदोन्नती राजीनामा इत्यादी कारणास्तव जवळपास 6726 इतकी पदे आणि मीरा भाईंदर विरार वसई पोलीस आयुक्तलय यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी Total 7231 पद भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. 

अशाप्रकारे सद्यस्थितीत पोलीस शिपाई संवर्गात एकूण 12528 भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. 

कायदा व व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने या संवर्गातील सर्व 100% रिक्त पदे तातडीने  भरणे आवश्यक आहे. 

वरील पार्श्वभूमी वर दिनांक 13/9/2019 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपाई संवर्गातील सन 2019 मधील 5297 पदे तसेच सन 2020 मधील 6706 मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12528 पदे 100% भरण्यासाठी शासन निर्णयास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. 

पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे

Police Bharti 2021

येथे आम्ही पोलिस भरती संदर्भातील सर्व latest माहिती देणारच आहोत, म्हणून latest माहिती मिळवण्यासाठी नेहमीच या Page ला भेट देत रहा. लेखी परीक्षा जाहीर झाल्यानंतर आम्ही पोलिस भारती हॉल तिकिट देखील प्रकाशित करू.

पोलीस भरतीच्या नवीन शुद्धीपत्रकाचा GR 13 January 2021 प्रकाशित करण्यात आला आहे. या GR मुळे आता पोलीस भरतीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. आज प्रकाशित झालेल्या GR नुसार आता EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी तसेच ओपन कॅटेगरीतील विद्यार्थांना वाढीव फीस भरण्यासाठी नव्याने 45 दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे.

येणाऱ्या आठ दिवसात, पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची लाट पसरलेली आहे. पोलीस भरती 2021 मध्ये एकूण १२,५२८ पदे भरण्यात येणार आहे व पहिल्या टप्यात जवळपास 7231 पदे भरले जातील, अशीही माहिती मिळाली आहे. पहिल्या टप्प्याची प्रकिया संपल्यानंतर लगेच दुसरा टप्प्यासाठी सुरुवात करण्यात येईल. पोलीस भरतीविषयी लेटेस्ट अपडेट्स मिळविण्यासाठी bharti.mpscstudy.in ला दररोज भेट देत रहा.

मेगा भरती अंतर्गत पोलीस भरती 2021 लवकरच सुरु होणार असून त्यासंदर्भात वृत्त नुकतेच प्रकाशित झाले आहे. येणाऱ्या 8 दिवसात भरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे. या मेगा भरतीमधून एसईबीसी प्रवर्ग वगळण्यात आला असून, ज्यांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केला आहे ते खुल्या प्रवर्गातून परीक्षा देतील. एकूण रिक्त पदांच्या 100 टक्के पदे भरण्यात येतील व येणाऱ्या 8 दिवसात हि प्रक्रिया सुरु होईल असे देखील प्रशासनाने सांगितले आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती शैक्षणिक पात्रता

विभागाचे नावपोलीस विभाग
पदांचे नाव1) पोलीस शिपाई & Other
एकूण जागा12,528 जागा
वेतनश्रेणी5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर
अर्ज पद्धतीऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळmahapolice.gov.in

पोलीस शिपाई चालकपोलीस शिपाई चालक या पदांसाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे

पोलीस शिपाई चालकपोलीस शिपाई पदाच्या **** जागा आहेत

उंची
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 सेमी असावी
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 सेमी असावी
छाती
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी
महिलालागू नाही

सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांच्या विभागणी साठी खालील तक्ता बघावा.

 विषयगुण
अंकगणित20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 20 गुण
एकूण गुण – 100

जे विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणार फक्त फक्त त्यांनाच शारीरिक चाचणी देता येणार. शारीरिक चाचणी हि एकूण 50 Marks साठी असेल. शारीरिक चाचणी अगोदर 50 Marks साठी वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. खाली Table मध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल Detailed मध्ये माहिती दिलेली आहे.
शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50 गुण
शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक (4 किलो)10 गुण
एकूण गुण50 गुण
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवाररुपये 450
मागासवर्गीय उमेदवाररुपये 350
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्जाला सुरुवातNot Declared Yet
अर्ज करण्याची शेवटची तारीखNot Declared Yet

जिल्ह्यानुसार Police Bharti 2021 Details

पोलीस भरती ची घोषणा होताच खाली Link दिल्या जाईल.

जिल्ह्याचे नावमाहितीसाठी तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करा
PunePune City Police Bharti साठी क्लिक करा
Pune Gramin Police Bharti साठी क्लिक करा
Pune Railway Police Bharti साठी क्लिक करा
PalgharPalghar City Police Bharti साठी क्लिक करा
KolhapurKolhapur City Police Bharti साठी क्लिक करा
JalgaonPune City Police Bharti साठी क्लिक करा
DhuleDhule City Police Bharti साठी क्लिक करा
Pimpri ChinchwadPimpri Chinchwad City Police Bharti क्लिक करा
NandurbarNandurbar City Police Bharti साठी क्लिक करा
SataraSatara City Police Bharti साठी क्लिक करा
AurangabadAurangabad City Police Bharti साठी क्लिक करा
NagpurNagpur City Police Bharti साठी क्लिक करा
Amravati GraminPune City Police Bharti साठी क्लिक करा
YavatmalYavatmal City Police Bharti साठी क्लिक करा
WashimWashim City Police Bharti साठी क्लिक करा
GadchiroliGadchiroli City Police Bharti साठी क्लिक करा
NandedNanded City Police Bharti साठी क्लिक करा
HingoliHingoli City Police Bharti साठी क्लिक करा
ParbhaniParbhani City Police Bharti साठी क्लिक करा
ChandrapurChandrapur City Police Bharti साठी क्लिक करा
GondiaGondia City Police Bharti साठी क्लिक करा
AhmednagarAhmednagar City Police Bharti साठी क्लिक करा
NashikNashik City Police Bharti साठी क्लिक करा
Nashik Gramin Police Bharti साठी क्लिक करा

Leave a Comment